Posts
Showing posts from February, 2022
My creations: poetry in Marathi: विचार कल्लोळ
- Get link
- X
- Other Apps
पसरत आहेत चौकटी; भोवताली असलेल्या विश्वाची माझ्या, उलगडताना ह्या बाह्य-उकली; उलगडतेय मी छटा अंतरंगाच्या, पाडतोय कवडसे विविध दृष्टीकोनांचे; मनातील माझ्या हा नवीन आरसा, कल्लोळ हा विचारांचा; हाताळावा तरी कसा! भुरळ घाली माझ्या मना; सुप्त गुणांच्या दाहीदिशा, घ्यावी उंच भरारी; इथल्या अन तिथल्या आकाशा, धरावी कोणती वाट कळेना मजला; शंकेचा अडथळा हा धुसर असा, कल्लोळ हा विचारांचा; हाताळावा तरी कसा! भासते कधी कधी ही अदृश्य बेडी; पाउलखुणांवर चालावयास भाग पाडणारी, शाबूत दृष्टीला खोचणारी असली तरीही; लोकप्रमाण मानून विस्तवात झोकणारी, नाईलाजास्तव पाळणाऱ्या; या सवयींना धुडकावणार तरी कसा, कल्लोळ हा विचारांचा; हाताळावा तरी कसा! उंचवावी शान म्हणुनी जगावे; कि आनंदाचा प्रकाशस्त्रोत बनण्यासाठी जगावे, दुनियादारीच्या फंद्यात पडावे; कि चाणक्यनीतीस अवलंबवावे; योग्य आणि अयोग्य यातही आणि त्यातही; प्रश्न हा सोडवावा तरी कसा, कल्लोळ हा विचारांचा; हाताळावा तरी कसा!
'तो' क्षण...पुनर्मिलापाचा....!! (my episode review of Eka Lagnachi Tisri Goshta, ELTG, Zee Marathi)
- Get link
- X
- Other Apps
Source: http://aaplasameaahe.blogspot.com/2014/02/Nilesh-Borhade.html 'तो' क्षण...पुनर्मिलापाचा....!! अखेर 'तो' क्षण आला. माहित होतं की ईशा आणि ओम परत एकत्र येणार, या सुंदर जोडीचा पुनर्मिलाप होणार, गैरसमजुतींच्या आघातामुळे कोमेजून गेलल हे प्रेमाचं फुल पुन्हा फुलणार. त्यामुळे असं जाणवत होतं की आनंदच होणार पण दारात अपराधी भावनेने उभ्या असलेल्या इशाच्या पाणावलेल्या डोळ्यातली पश्चातापाची भावना आणि ओमच्या मिठीत स्वतःला घट्ट आवळून घेण्याची तीव्र इच्छा दिसली आणि माझ्या मनातल्या भावना अनावर होऊ लागल्या आणि जेंव्हा इशाने ओमला मिठी मारली तेंव्हा तर त्या भावनांचा उद्रेक झाला आणि आनंदाश्रू नाही आवरता आले. व्यावहारिक जीवनशैलीची झालर चढवलेल्या वस्त्रांचा पेहराव करून या भावनाशुन्य जगात मी स्वतःला मिरवण्याचा सतत प्रयत्न करतो पण मग ELTG सारखी कलाकृती आणि उमेश आणि स्पृहा सारखे ओम आणि इशाच्या व्यक्तिरेखेला अक्षरशः जिवंत करणारे कलाकार जेंव्हा समोर येतात तेंव्हा मात्र 'ती' वस्त्रं कुठेतरी माझ्यातल्या भावनिक माणसाला गुदमरून टाकतात आणि मग एकदा तरी प्रेमात पडून बघावं अशी सुप्त इच्छा ...